मा. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी १५ ऑगस्ट २००८ या भारतीय स्वातंत्र्यांच्या ६१ व्या वर्धापनदिनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे सूक्ष्म उद्यम उभारणीसाठी उद्योजकांना सक्षम बनविणारी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही नवी योजना जाहिर केली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यान्वित असलेली पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व खादी व ग्रामोद्योग आयोगाची आर. ई. जी. पी. योजना या दोन्ही योजना एकत्रित करून ही नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
(अ) उद्देश : ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. खेडयापाडयातून शहराकडे येणार्या बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे.
(ब) योजने अंतर्गत उद्योगाची व्याख्या : खादी आयोगाने ठरविलेल्या नकारात्मक उद्योगाव्यतिरिक्त सर्व उद्योग या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
नकारात्मक उद्योग यादी:-