महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे करीता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून काम करण्याची मला मिळालेली संधी ही एक पर्वणीच आहे. माझ्या प्रशासकीय अनुभवाच्या शिदोरीवर मी मंडळास यथोचित न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.

धन्यवाद !