आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मला या वैशिष्टयपूर्ण क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली हे मी माझे सौभाग्य समजतो.

आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वात सोशल मीडियास एक महत्त्वाचे स्थान आहे. संपर्काचे, विचार मांडण्याचे एक मोठे साधन म्हणून याकडे बघितले जाते. आजच्या काळात सरकारी, निमसरकारी संस्था व संघटना आपले संकेतस्थळ तयार करुन जनतेपुढे आपल्या कामाची माहिती देतात. त्यावर संस्थेची एक प्रतिमा समाजात तयार होत असते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे संकेतस्थळ नवीन स्वरुपात सादर करतांना आम्हास अतिशय आनंद होत आहे. या संकेतस्थळाचा उपयोग आपल्याला मंडळाच्या विविध योजनांची माहिती मिळणेसाठी उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास आहे.

धन्यवाद !