सन १९३५ साली कॉग्रेसच्या फैजपूर जि. जळगांव येथील राष्ट्रीय अधिवेशनात कै. कृष्णाजी बापूजी जोशी यांनी सरकीपासून बनविलेला हातकागद राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना दाखविला सरकीपासून तयार करण्यात आलेला हातकागद राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना खूप आवडला त्यानंतर हातकागद उद्योगाविषयी संशोधनात्मक व प्रयोगात्मक कामासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेने पुणे येथील शेतकी महाविद्यालयाच्या आवारात कै. कृष्णाजी बापूजी जोशी यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली. हातकागद संस्थेचे कार्य खालीलप्रमाणे तीन विभागात अविरतपणे सुरू आहे.