ग्रामीण भागातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मातीकला वस्तुंचे प्रदर्शन’ शिवाजीनगर येथे दि. ०१/०५२०२३ रोजी आयोजित केले आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आणि सभापती रवींद्र साठे साहेब, उद्योजक श्रीकांत बडवे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

