शासनाचा मधाचे गाव या संकल्पनेला पुरस्कार…
राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्या कार्याचा गौरव..!!
राज्य शासनाचा राजीव गांधी प्रशाकीय गतिमानता अभियानातील सर्वोत्कृष्ट संकल्पनेचा द्वितीय पुरस्कार मंडळाच्या ‘मधाचे गाव’ या संकल्पनेला दि. २१/०४/२०२३ रोजी मिळाला आहे.
मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा मॅडम यांची हि संकल्पना मांघर ता महाबळेश्वर या गावात प्रत्येक्ष राबविण्यात आली आहे. मधाचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेले मांघर स्वयंपूर्ण झाले आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा मॅडम यांचा गौरव करण्यात आला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप व संचालक डी. आर. पाटील हे देखील उपस्थित होते.