यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठान मुंबई येथे मंडळाचा ६५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.महाराष्ट्र शासनाचे उद्योग विभागाचे सर्वेसर्वा नामदार उदयजी सामंत मंत्री महोदय ,प्रधान सचिव उद्योग – डॉ.पी अनबलगन, खादी व ग्रामोद्योग आयोग राज्य निदेशक श्री योगेश जी भामरे , मंडळाचे अध्यक्ष मा. रवींद्र साठे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. गीतांजली बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंडळाचे सर्व आजी-माजी कर्मचारी आणि अधिकारी,उद्योजक आजच्या या समारंभास उपस्थित होते.










