महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र साठे, राज्यमंत्री दर्जा, मा. श्री. राजेश अग्रवाल, भा.प्र.से., मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मा. श्री. अलबनगन, भा.प्र.से., प्रधान सचिव, उद्योग विभाग, श्रीमती विद्या देशभ्रतार, भा.प्र.से., विकास आयुक्त तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मण रावत, भा.प्र.से. यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये मंडळाच्या नोंदणीकृत ग्रामोद्योग संस्थांमार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध खादी व ग्रामोद्योग वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. प्रदर्शनास मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




