श्रीमती नीता आणि प्रशांत बडेकर, मौजे-मुंढे, जिल्हा-कराड यांनी सुरू केलेल्या ‘मधुबन’ मध विक्री केंद्राचे उद्घाटन मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री.रवींद्र साठे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले. या प्रसंगी श्री.दिग्विजय पाटील-विशेष कार्य अधिकारी, श्री. निसार तांबोळी-जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी-सातारा व श्री. दिलीप साळुंखे (सेवानिवृत्त मंडळ कर्मचारी) देखील उपस्थित होते.

